बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (12:26 IST)

‘विक्की वेलिंगकर’ होणार ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या थ्रिलर मराठी चित्रपटामधील या मुखवट्यामागे कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ती ६ डिसेंबर २०१९ रोजी ‘विक्की वेलिंगकर’ प्रदर्शित होईपर्यंत ताणली जाणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे.
 
‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे या चित्रपटाची प्रस्तुती प्रणय चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्याने करत आहेत. ‘विक्की वेलिंगकर’चे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून निर्मिती ‘जीसिम्स’, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.
 
चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी मुंबईत ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर प्रकाशित केले. या पोस्टरवरून ही व्यक्तिरेखा खलनायकी असल्याचे लक्षात येते. मात्र या व्यक्तिरेखेच्या मागील म्हणजेच मुखवटयामागील चेहरा कोण आहे, याबद्दलची उत्कंठा काही शमली जात नाही. या मुखवट्यामागे नेमका कोणाचा चेहरा आहे याबद्दल अनेक कयास लावले जात असले तर त्याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही. मात्र ही मराठीतील अनोखी संकल्पना असल्याचे प्रत्येकानेच मान्य केले आहे. 
 
मराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे ‘मॅन’ कॅरेक्टर कधीच साकारले गेले नव्हते. ‘मास्क मॅन’ ही व्यक्तिरेखा या ‘विक्की वेलिंगकर’च्या या कथेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. मात्र चांगल्याचा वाईटावर विजय होतो का हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत वाट पहावी लागेल,” असे उद्गार या चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. वर्मा यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’, ‘7 अवर्स टू गो’ आणि इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 
 
“ही कथा एका तरुणीवर बेतलेली असून ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे आणि ती घड्याळे विकते. आजच्या डिजिटल अनागोंदीच्या काळात ती विक्री करीत असलेल्या वस्तूंना तसे काहीच महत्त्व नाही,” असेही सौरभ वर्मा यांनी म्हटले. 
 
या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक धक्के आणि वळणे आहेत. ‘मास्क मॅन’ हा केवळ एक ट्रेलर आहे. ज्याप्रमाणे रामाचा रावणावरील विजय हा अनेकांना प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारा ठरतो त्याप्रमाणे ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा शेवट आनंदायी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. मंगळवारी प्रकाशित झालेल्या पोस्टरची टॅगलाईनसुद्धा ‘मुखवट्यामागे चेहरा लपतो, रावण नाही’ अशाच आशयाची आहे, असेही दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी म्हटले आहे.
 
जीसिम्स विषयी–
अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ने यापूर्वी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांच्या निर्मितीबरोबर त्यांनी भिकारी या चित्रपटाची प्रस्तुती केली होती. ‘जीसिम्स’ हा मराठीतील एक आघाडीचा स्टुडियो असून कंपनी चित्रपट, टीव्ही आणि वेबसिरीज तसेच टॅलेंट मॅनेजमेंट आणि सॅटॅलाइट ॲग्रीगेशन या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
 
‘डान्सिंग शिवा’ विषयी-
अनुया चव्हाण कुडेचा आणि रितेश कुडेचा हे दोघे ‘डान्सिंग शिवा’चे भागीदार असून त्यांनी अलिकडे गाजलेला हिंदी चित्रपट ‘द ताश्कंद फाईल्स’ची सह-निर्मिती केली होती. त्यांनी ‘ऑल अबाऊट सेक्शन ३७७’ या सध्या ‘सोनी लिव’वर सुरू असलेल्या वेबसिरीजची यशस्वी निर्मिती केली आहे. त्याचबरोबर ‘वोह वाली पिक्चर’ या ‘झी5’वर लवकरच येणाऱ्या वेब सिरीजची निर्मिती त्यांनी केली आहे.
 
‘लोकी स्टुडिओ’ विषयी-
सचिन मारुती लोखंडे आणि अतुल जनार्दन तारकर यांच्या नेतृत्वाखालील लोकी स्टुडिओने सोशल मीडिया मार्केटिंग, ब्रँड असोशिएशन, ब्रँडेड कॉन्टेट, चित्रपट निर्मिती, व्हिज्युअल प्रमोशन आदी अनेक क्षेत्रांत काम केले आहे.