रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (12:09 IST)

विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी, ते विचार करूनच बोलले असतील - अवधूत गुप्ते

अभिनेत्री कंगना राणावतच्या 'देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं' या भूमिकेला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन दर्शवलं होतं.
त्यानंतर आता संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांनी गोखले यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे.
 
"विक्रम गोखले हे आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. ते विचार करूनच बोलले असतील," अशी प्रतिक्रिया अवधूत गुप्ते यांनी याप्रकरणावर बोलताना दिली.
 
"गोखले यांनी व्यक्त केलेलं मत संपूर्ण विचाराअंती असावं. त्यावर बोलण्याची माझी पात्रता नाही," असं गुप्ते म्हणाले.
 
दरम्यान, कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर थेट बोलणं मात्र गुप्ते यांनी टाळलं.