शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 (11:11 IST)

बिग बींसोबत झळकली अमृता

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची इच्छा जवळपास सर्वच लहानमोठ्या कलाकारांच्या मनात असते. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरची ही इच्छा नुकतीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण झाली. अमिताभ बच्चन यांच्या ‘आज की रात है जिंदगी’ या कार्यक्रमाच्या एका खास एपिसोडमध्ये अमृता खानविलकर दिसणार आहे.

या शोमधून सर्वसामान्य व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाची दखल घेतली जाते. शिवाय या व्यक्तींच्या इच्छाही पूर्ण केल्या जाणार आहेत.

या कार्यक्रमात हेमलता नावाच्या तरुणीच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हेमलताने अंधांचा ऑर्केस्ट्रा स्थापन करून त्यांची वेगळी ओळख जगाला करून दिली. तिची अमृता खानविलकरसोबत डान्स करण्याची इच्छा असल्यामुळेच या खास भागासाठी अमृताला आमंत्रित करण्यात आलं होतं. अमृताने अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक सेल्फी काढून ट्विटरवर शेअर केला होता. त्यातून अमृताच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी अमृताने पती हिमांशूच्या साथीने ‘नच बलिए’ या डान्स रिअँलिटी शोचं जेतेपद मिळवलं होतं.