शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सांगली , मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (16:44 IST)

विक्रम गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार

मराठी रंगभुमीवरील अत्यंत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर झाला आहे. ५ नोव्हेंबरला अर्थात रंगभुमीदिनी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

गौरव पदक, स्मृती चिन्ह आणि ११ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदाचे मानकरी गोखले यांचे वडील व अभिनेते चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वडील आणि मुलाला पुरस्काराने गौरवण्याचा योग जुळून येत आहे.