शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 3 नोव्हेंबर 2015 (14:24 IST)

विक्रम गोखले यांनी शेवटच्या क्षणापर्यंत रंगभूमीची सेवा करावी : दिलीप प्रभावळकर

रंगभूमी हा माझा श्वास : विक्रम गोखले

विक्रम गोखले यांनी आयुश्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगभूमीची सेवा करावी आणि रसिक प्रेक्षकांना दर्जेदार अभिनयाचा आनंद द्यावा, असे प्रतिपादन सुप्रसिद्द जेष्ट अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी केले. विक्रम गोखले यांना नाट्य रंगभूमीचा मानाचा आणि प्रतिष्टेचा सांगली येथील "विष्णुदास भावे पुरस्कार" जाहीर झाल्याने गिरीवन ग्रुप च्या वतीने गोखले यांचा बालगंधर्व रंगमंदिर येथे जेष्ट अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी प्रभावळकर बोलत होते, यावेळी  गिरीवन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हाळगी, जेष्ट दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर, गिरीवन ग्रुपचे संचालिका सुजाता म्हाळगी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रसिक प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणालेकी, रंगभूमीचा मानाचा आणि प्रतिष्टेचा "विष्णुदास भावे पुरस्कार"साठी प्रदीर्घ रंगः भूमीची सेवा करणाऱ्या या मनस्वी अभिनेत्याची निवड केली गेली हि अतिशय योग्य आणि अभिमानस्पद गोष्ट आहे. विक्रम यांनी शेवटच्या क्षणापर्यंत रंगभूमीची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशीही आशा प्रभावळकर यांनी व्यक्त केली.
 
पुरस्काराला उत्तर देताना विक्रम गोखले म्हणालेकी, रंगभूमी हा माझा श्वास आहे. रंगभूमीवरील अभिनय मी स्वत जगात असल्याने रंगभूमी पासून कधीही दुरावलो नाही. दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वा सारख्या अभिनेत्यच्या  हस्ते माझा सन्मान होतो, हा माझा जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण समजतो. या जेष्ठ अभिनेत्याला मी वंदन करतो. असे म्हणत विक्रम गोखले यांनी रसिक प्रेक्षांसमोर प्रभावळकरांचे चरण स्पर्श केले. 
 
गिरीवन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हाळगी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजाराम वाघमोडे यांनी केले. विक्रम गोखले यांना "विष्णुदास भावे पुरस्कार" हा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष्य आणि जेष्ठ अभिनेत्री प्फैयाज यांच्या हस्ते  येत्या ५ नोव्हेम्बेरला सांगली येथे प्रधान करण्यात येणार आहे.