शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 (16:25 IST)

सईने घटवले वजन

आता मराठीतही बॉलिवूडमध्ये नायक-नायिकांप्रमाणे भूमिकेच्या मागणीनुसार लूकमध्ये, शरीरयष्टीमध्ये बदल करण्याचा ट्रेंड सुरू झाला असून सध्याची मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरला दोन वेगवेगळ्या भूमिकांसाठी आपल्या वजनावर विशेष लक्ष द्यावे लागले. सईला गुरु पौर्णिमा या चित्रपटासाठी वजन वाढवावे लागले तर, प्यारवाली लव स्टोरीसाठी पुन्हा वाढवलेले वजन घटवावे लागले.

दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुरुपौर्णिमामध्ये व्यक्तिरेखेला साजेसा लूक असावा यासाठी मला वजन वाढवावे लागले. त्यावेळी वजन वाढवण्यासाठी मी खाण्याचा सपाटा लावला होता. गुरुपौर्णिमाचे चित्रीकरण संपल्यानंतर लगेच संजय जाधव यांच्या प्यारवाली लव स्टोरीचे चित्रीकरण सुरु होणार होते. या भूमिकेसाठी माझा सडपातळ लूक आवश्यक होता. त्यामुळे दोन महिने मला वाढवलेले वजन घटवण्यासाठी जिममध्ये घाम गाळावा लागला. या दोन महिन्यात सईने सात किलोने वजन घटवले. याच दरम्यान सईने किक बॉक्सिंग शिकून घेतली. किक बॉक्सिंगमुळे माझे वजन तर घटलेच पण क्लासमेटमधल्या अँक्शन सीन्समध्ये मला किक बॉक्सिंगचा बराच फायदा झाला असे सईने सांगितले.