1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2015 (14:03 IST)

हिमांशूची स्ट्रीक टीचर

अभिनेता सचिन आणि सुप्रिया यांच्या जोडी नंतर नच बलियेच्या सातव्या पर्वात अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा परफोर्म करणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. पण या सगळ्यात खरा कस हिमांशूचा लागणार आहे. महाराष्ट्राची लाडकी ग्लॅमडॉल अमृता नाचात एकदम तरबेज आहे तर हिमांशू डान्स स्टेप बाय स्टेप शिकतोय. नच बलिये मध्ये हटके परफोर्मन्स देण्यासाठी दोघेही अगदी जीव तोडून मेहनत घेत आहेत. त्यासाठी अमृता सालसा, टॅंगो, हिप हॉप यासारखे डान्स परफोर्मन्स शिकतेय. याआधी तिने ट्रेडीशनल वेस्टर्न परफोर्मन्स दिले आहे. महत्वाचं म्हणजे या निमित्ताने या दोघांच्या लाखो चाहत्यांना त्यांना लग्नानंतर एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. या सर्व डान्स परफोर्मन्ससाठी अमृता खूप उत्सुक असल्याच सांगते, नच बलियेसाठी आम्हाला विचारलं तेव्हा चटकन सचिन आणि सुप्रियाजींची आठवण झाली. या जोडीनंतर जवळपास ७ वर्षांनी मी हिमांशू सोबत महाराष्ट्राची लेक आणि जावई म्हणून या स्पर्धेत सहभागी झालो आहोत. 
 
मुळात मला डान्सची प्रचंड आवड असल्यामुळे माझ्या करियरमध्ये या कलेने मला नेहमी साथ दिली आहे. दुसरी साथ मिळाली ती हिमांशूची. एका पेक्षा एक स्पर्धेत असताना एकही रिहर्सल त्याने चुकवली नाही. माझ्या इतकाच तो देखील रिहर्सलसाठी उत्साही असायचा. किंबहुना त्याच्याच आग्रहाने मराठी सिनेसृष्टीत मी पदार्पण केले. आपल्याकडे निर्माण होणारे सिनेमे आणि त्यांचे विषय हे अतिशय दर्जेदार असल्याने माझ्या चित्रपटात येण्याच्या निर्णयाला देखील हिमांशूने मोठा पाठींबा दिला. आय ऍम सो लकी ही इज इन माय लाईफ!… 
 
हिमांशू खूप मेहनती असला तरीही त्याच्याकडून स्टेप्स आणखी चांगल्या करून घेण्यासाठी मला त्याची स्ट्रीक टीचर व्हावं लागतं.  जिथे मी एक तास रिहर्सल करते तिथे हिमांशू चार तास जीव ओतून सराव करत असतो. मी आणि कोरीयोग्राफार प्रतिक आणि पृथ्वी यांनी सांगितलेल्या लहान मोठ्या टिप्स तो नीट शांतपणे ऐकून घेतो. त्या फॉलो करतो. आम्ही दोघही आमचा बेस्ट परफोर्मन्स देण्यासाठी खूप मेहनत आणि प्रयत्न करतोय. त्यामुळे महाराष्ट्राचं प्रेम आमच्या जोडीला हि स्पर्धा जिंकवून देईल असा मला विश्वास वाटतो.