शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2015 (17:49 IST)

‘टाइमपास २’ चे म्युजिक लाँच

झी टॉकीज आयोजित ‘फूल टू टाइमपास’ या भव्य सोहळ्यात, अवघा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘टाइमपास २’ चे म्युजिक लाँच झाले. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 
 
उर्मिला कानेटकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी तसेच टाइमपास चित्रपटातील लोकप्रिय जोडी प्रथमेश आणि केतकीच्या परफॉर्मन्सनी कार्यक्रमात रंगत आणली. स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, महालक्ष्मी यांच्या बहारदार गाण्यांनी रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले. 
 
अनेक मान्यवरांसह ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास २’ चे सर्व कलाकार या म्युजिक लाँचसाठी उपस्थित होते. या कलाकारांनी सादर केलेल्या धमाल परफॉर्मन्सनी  उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
 
२० मार्च २०१५ रोजी पुण्यात पार पडलेल्या या सोहळ्यात प्रेक्षकांना सहभागी होता यावं म्हणून त्यांच्यासाठी फ्री पासेस ‘बालगंधर्व’ नाट्यगृहात उपलब्ध करण्यात आले होते. तसेच हा सोहळा अवघ्या महाराष्ट्राला अनुभवता यावा यासाठी ५ एप्रिल रोजी झी टॉकीजवर हा सोहळा प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
 
केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांच्या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकल्यावर आता प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव ही जोडी प्रेक्षकांचे मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. टिकीट बारीवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणा-या टाइमपास नंतर एस्सेल व्हीजन आणि अथांश कम्युनिकेशन्स ची निर्मिती असलेला टाइमपास २ हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.