धोनीची अग्निपरीक्षा आजपासून !
आजपासून सुरू होणार्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडकडून झालेल्या मानहानिकारक पराभवाचा हिशेब चुकता करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ शुक्रवारी पहिल्या लढतीत मैदानात उतरणार आहे. धोनीसाठी ही अग्निपरीक्षाच असेल.महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौर्यावर एकही आंतरराष्ट्रीय लढत जिंकू शकला नव्हता. त्यांना चार कसोटी, तीन वनडे आणि एका टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार अँलिस्टर कूकला विजयी मालिका कायम ठेवण्याची आशा असणार आहे. तथापि, इंग्लंडला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडची उणीव नक्कीच भासणार आहे. धोनीसाठीदेखील ही मालिका अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही. सध्याच्या संघात केवळ प्रवीणकुमार हाच सर्वात अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याने केवळ 56 वनडे सामनेच खेळले आहेत. नुकतेच झालेले सामने आणि नेटमधील सराव पाहता कर्नाटकचा वेगवान गोलंदाज एस. अरविंद आणि झारखंडचा वरुण आरोन यांना अंतिम अकरा जणांत संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वरुण आरोन, उमेश यादव, विनय कुमार, एस अरविंद, राहुल शर्मा, मनोज तिवारी, प्रवीण कुमार.इंग्लंड : अँलिस्टर कूक (कर्णधार), क्रेग किस्वेटर, जोनाथन ट्रॉट, इयान बेल, केविन पीटरसन, रवी बोपारा, जोनाथन बेयरस्टा, ग्रीम स्वान, समित पटेल, टिम ब्रेस्नन, स्टीव्ह फिन, स्टुअर्ट मिकर, ख्रिस वोक्स, स्काट बोर्थविक, जोस बटलर, एलेक्स हेल्स.