गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

बीसीसीआयला १२१ कोटींचा दंड

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर फेमा (फॉरेन एक्सचेंज ऍक्ट) कायद्या अंतर्गत  २४३ कोटी रुपयांचे लेनदेन केल्याप्रकरणी १२१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
आयपीएलचा दुसरा मोसम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. २००९ साली झालेल्या या स्पर्धेत बीसीसीआयकडून २४३ कोटींचा व्यवहार करण्यात आला होता. हा व्यवहार कायद्याचे उल्लंघन करुन करण्यात आला होता. ‘ईडी’कडून याची चौकशी करण्यात आली. त्यानुसार आता बीसीसीआयवर ८२.६६ कोटी, ललित मोदींवर १०.६५ कोटी आणि एन. श्रीनिवासन यांच्यावर ११.५३ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही अधिकारी व कंपन्यांचाही समावेश आहे.