1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , बुधवार, 18 डिसेंबर 2019 (14:15 IST)

आसीसीच्या संघात स्मृती मंधानाला स्थान

Smrita Mandhana
टीम इंडियाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधाना महिला आयसीसीच्या 2019 या वर्षातील एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले आहे. वर्षभरात खेळल्या जाणार्‍या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणार्‍या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून आयसीसी वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते.
 
त्यातील एकदिवसीय आणि टी-20 अशा दोनही संघात भारताच्या स्मृती मंधानाचा समावेश करण्यात आला आहे. 
 
स्मृतीने वर्षभरात 51 एकदिवसीय सामने तर 66 टी20 सामने खेळले. त्यात तिने अनुक्रमे 2 हजार 25 आणि 1 हजार 451 धावा केल्या. तिच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आसीसीकडून तिला हा बहुमान मिळाला आहे. स्मृतीव्यतिरिक्त शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचाही वर्षाच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी टी-20 संघात स्थान मिळवले आहे. आसीसीने मंगळवारी दोन्ही संघ जाहीर केले. ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू घोषित करण्यात आले.