बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सिडनी , मंगळवार, 2 मार्च 2021 (15:24 IST)

अश्विनचा वनडे संघात समावेश करा : हॉग

भारताचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये कित्येकदा मॅचविनर सिध्द झाला आहे. मात्र, तो दीर्घ काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर राहिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू ब्रॅड हॉगने अश्विनला भारताच्या एकदिवसीय संघात सामील करण्याचे आवाहन केले आहे.

तो म्हणाला की, हा वरिष्ठ ऑफस्पिनर विकेट मिळवण्यात तरबेज आहे व त्याच्यामुळेच तळातील फलंदाजीलाही मजबुती मिळते. एका चाहत्याच्या  प्रश्नाला टि्वटद्वारे उत्तर देताना हॉगने आपले मत मांडले.