युवराज सिंहसाठी अनुष्का शर्माची इमोशनल पोस्ट, युवीने म्हटले धन्यवाद रोजी भाभी
भारताचे उत्तम ऑलराउंडर आणि 2011 विश्व चषकाचे नायक युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटहून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचे कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीने युवराजसाठी विशेष मेसेज पाठवला आहे. अनुष्का शर्माने युवराजला योद्धा असल्याचे म्हटलं आहे. आणि युवराजला सर्व आठवणींसाठी धन्यवाद देते लिहिले की ते एक वॉरियर आणि लोकांसाठी प्रेरणा आहे. अनुष्काने युवराजला त्यांच्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.
अनुष्का शर्माच्या या पोस्टवर युवराज सिंहने उत्तर दिले आहे. त्याने यावर कमेंट करत लिहिले- धन्यवाद रोजी भाभी, आपल्यावर ईश्वराची कृपा असावी.
विराट कोहली आणि युवराज सिंह चांगले मित्र आहेत. दोघांना अनेकदा मस्तीच्या मूडमध्ये बघितले गेले आहे. त्या दोघांच्या मस्तीमध्ये अनुष्का देखील सामील असते. अनुष्का शर्माच्या वाढदिवसाला देखील युवराज सिंहने तिला रोजी भाभी संबोधित करत शुभेच्छा दिल्या होत्या. तो अनुष्का अनेकदा याच नावाने हाक मारतो.
अनुष्काच्या व्यतिरिक्त अनुपम खेरने ट्विट करून म्हटले की युवराज आपणं जगभरातील लाखो भारतीयांना केवळ महान क्रिकेटरच्या रूपातच नव्हे तर एका अशा व्यक्तीच्या रूपात प्रेरित केले आहे, जी केवळ विजेता आहे. आपल्यासारखे लोकं कधीही रिटायर होत नाही. आम्ही नेहमी आपल्या सामर्थ्य आणि साहसाचे कौतुक करणार.
युवराजसाठी नेहा धूपियाने देखील लिहिले की मला जेव्हा कधी माझ्या आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारण्यात येईल मी नेहमी तुझं नाव घेईन. आणि आता हे बदलणार नाही. युवराज आपली आठवण नेहमी राहणार. नेहासोबतच नेहाच्या पती अंगदने देखील युवराजसाठी ट्विट केले.
बॉलीवूड कलाकार वरुण धवनसह अनेक लोकांनी युवराजसाठी ट्विट केले.
उल्लेखनीय आहे की युवराज सिंहने कँसरशी लढत भारताला 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्यात विशेष भूमिका बजावली होती. युवराज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट देखील होते. युवराजने भारतासाठी 304 वनडेमध्ये 8 हजार 701 रन काढले होते. युवराजने 2000 साली केन्या विरुद्ध वन-डे मध्ये डेब्यू केले होते आणि आपला शेवटला वनडे सामना वेस्टइंडीज विरुद्ध खेळला होता.