गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (07:24 IST)

Asia Cup Schedule: आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; भारताचे सामने श्रीलंकेत

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) यांनी अखेर आगामी आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी ही स्पर्धा 'हायब्रीड मॉडेल'मध्ये होणार आहे. आशिया चषकाचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहेत. भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिल्यानंतर एसीसीने पीसीबीचे 'हायब्रिड मॉडेल' स्वीकारले. टीम इंडिया आपले सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारताचं संघ  2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
 
एसीसी चे अध्यक्ष जय शाह यांनी ट्विट करून लिहिले, “मला बहुप्रतिक्षित पुरुष एकदिवसीय आशिया चषक 2023 चे वेळापत्रक जाहीर करताना आनंद होत आहे, जे विविध देशांना एकत्र बांधणारे ऐक्य आणि एकता यांचे प्रतीक आहे. क्रिकेटच्या उत्कृष्टतेच्या उत्सवात आपण सामील होऊ या
 
30 ऑगस्ट पाकिस्तान विरुद्ध नेपाळ मुलतान
31 ऑगस्ट बांगलादेश विरुद्ध श्रीलंका कँडी
2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध भारत कँडी
3 सप्टेंबर बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान लाहोर
4 सितंबर भारत बनाम नेपाल कँडी
5 सप्टेंबर अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका लाहोर
 
सुपर-4 फेरी
6 सप्टेंबर A1 वि B2 लाहोर
9 सप्टेंबर B1 वि B2 कोलंबो
10 सप्टेंबर A1 वि A2 कोलंबो
12 सप्टेंबर A2 वि B1 कोलंबो
14 सप्टेंबर A1 वि B1 कोलंबो
15 सप्टेंबर A2 वि B2 कोलंबो
अंतिम-
17 सप्टेंबर सुपर4 - 1 वि 2 कोलंबो
 
स्पर्धेत सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात 31 ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे.
 
भारताचे वेळापत्रक
भारतीय संघ आपला पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 4 सप्टेंबरला त्याच मैदानावर त्याचा सामना नेपाळशी होणार आहे.
 
गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर टप्प्यासाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. यावेळी आशिया कप 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी संघांना त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्याची ही सुवर्णसंधी असेल.
 
अफगाणिस्तान संघ लाहोरमध्ये दोन सामने खेळणार
बांगलादेशचा संघ अफगाणिस्तानशी 3 सप्टेंबरला लाहोरमध्ये खेळेल आणि त्यानंतर श्रीलंका संघ 5 सप्टेंबरला अफगाणिस्तानशी खेळेल. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश हे संघ पहिल्या फेरीत अव्वल चारपैकी कोणतेही स्थान मिळवू शकतात, परंतु या संघांचा क्रम निश्चित राहील, असेही या वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तान A1 असेल आणि भारत A2 असेल. श्रीलंका B1 आणि बांगलादेश B2 असेल. नेपाळ आणि अफगाणिस्तानने सुपर फोरमध्ये प्रगती केल्यास ते बाहेर पडलेल्या संघाची जागा घेतील.
 
Edited by - Priya Dixit