1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 1 एप्रिल 2021 (13:28 IST)

आयपीएलमध्ये षटकांची गती न राखल्यास कर्णधारावर बंदी

बीसीसीआयने आयपीएलच्या नवीन हंगामाबाबत कडक नियमावली तयार केली आहे. यंदा आयपीएलमध्ये सॉफ्ट सिग्नल काढून टाकण्यासोबत 90 मिनिटात 20 षटके पूर्ण करण्याच्या नियमाचाही या नियमावलीत समावेश करण्यात आला आहे. शिवाय, षटकांची गती राखता आली नाही, तर संबंधित संघाच्या कर्णधाराला एका सामन्याची बंदीची शिक्षा होणार आहे.
 
नियमावलीनुसार, तीन सामन्यांत षटकांची गती राखता आली नाही, तर कर्णधारावर एका सामन्यावर बंदी घालण्याची तरतूद बोर्डाने केली आहे. पहिल्यांदा ही चूक झाल्यास  कर्णधाराला 12 लाख, दुसर्यां्दा असे झाल्यास 24 लाख आणि तिसर्यांरदा अशी चूक झाल्यास  30 लाख अशी दंड रक्कम वसूल केली जाईल. तिसर्याग चुकीमुळे 30 लाखांचा दंड आणि सामनाबंदी या दोन्ही शिक्षा कर्णधाराला होणार आहेत.