शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2017 (10:31 IST)

क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

नाशिकमध्ये क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश झाले आहेत. व्याख्यान देण्यासाठी गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने भीष्मराज बाम यांचं निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा नरेंद्र आणि अजित असा परिवार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अंजली भागवत, कविता राऊत, पी. गोपीचंद यांच्यासह अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम हे मार्गदर्शक म्हणून लाभले. ‘मार्ग यशाचा’, ‘संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती’, ‘विजयाचे मानसशास्त्र’, ‘मना सज्जना’ यांसारखी पुस्तकंही भीष्मराज बाम यांनी लिहिली. या पुस्तकांचा हिंदी, पंजाबी आणि तामिळ भाषेतही अनुवाद झाला. याचबरोबर मराठीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये बाम यांनी स्तंभलेखनही केले.