गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (13:13 IST)

क्रिकेटचा देव सचिन आणि क्रिकेट युद्ध

भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जणू भारत पाक युद्धच असत. संपूर्ण जगाच भारत पाक सामान्याकडे लक्ष असते.आता ह्या दळभद्री पाकीस्तानने पुलवामात भ्याड हल्ला केला. भारत चौफेर पाकची नाकेबंदी करत असतानाच भारतात लोकप्रिय असलेला पण भारताचा  राष्ट्रीय खेळ नसलेल्या क्रिकेटचा भारत पाक चा सामन्याचा निघणार नाही हे कस शक्य आहे?
क्रिकेटचा देव सचिनने क्रिकेट कडे खेळाच्या नजरेने बघत भारत पाक सामना व्हावा असं मत व्यक्त केल. यात त्याची काय चूक त्याची खेळाडू वृत्तीच त्याला तस वक्तव्य करायला भाग पाडत होती.पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर क्रिकेट हा भारत मध्ये नुसता खेळ नसून लोकांचा जीवनातील अविभाज्य घटक आहे.येवढ लोकांना क्रिकेट आवडत.अन त्यात भारत पाक सामना असेल तर विचारूच नका ते युद्धच असत. अन हे युद्ध भारत जिंकला तर ठीक नाहीतर भारतीय खेळाडूंची काही खैर नसते लोक अक्षरश : खेळाडूंच्या घरांवर दगड फेक करतात . मग भारतीय खेळाडूंना हे युद्ध जिंकावच लागत.अशात आता वर्ल्ड कपचा फेवर लोकांमध्ये असेलच. अन त्यात भारत पाक सामना पूर्व नियोजित आहे. अन त्यावर सध्या घमासान सुरु आहे. बी सि सि आ य म्हणताय आम्ही सरकार ला विचारून निर्णय घेऊ तर दुसरीकडे आयसिसि च म्हणय आम्ही तुमच्यावर सामना न खेळल्यास कार्यवाही करु. खर बघता ह्या साऱ्याचा काय परिणाम होणार आहे हे भारतातील गुप्तचर यंत्रणाच सांगू शकतात.सामना का होऊ नये याची बरीच कारण आपल्या कडे आहेतच अन सर्वच देश भारताला पाठिंबा देत आहेत तेव्हा भारताने पाक विरुद्धतील सामना खेळूच नये अस भारतच मत आहे. पण क्रिकेटचा देव सचिन याने दिलेल मत किती चूक आहे ह्या विषयी माहिती घेऊ.
 
भारत पाक सामना होणं म्हणजे त्या सामन्यातून बराच महसूल नक्कीच गोळा होईल सर्वात जास्त महसूल हा फक्त ह्या एकासामन्याने होत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनांचा निम्मे महसूल जरी म्हटलं तरी चालेल इतका महसूल ह्या सामन्यातून मिळतो. मग हा महसूल त्या सामान्यच मानधन खेळाडूंना नक्कीच मिळत. अन पाक खेळाडूंना मानधन मिळत. त्यांच्या देशाला याचा काही भाग नक्कीच मिळत असेल. पाकिस्तानला यातून खूप फायदा आहेच. सामन्यातील जाहिराती याचा पैसा पाकमधील चॅनेल यांना मिळणार पैसा हे सार बघता आपण विचार नक्कीच करू कि सामना व्हावा कि नाही. आर्थिक दृष्ट्या पाकिस्तान ला फायदा होणं भारताला परवडन्यासारखं नाही. सचिनच मत हे खेळाडू वृत्तीतून समोर आलेले मत आहे. बारकाईने त्याचा विचार झालेला नाही त्यामुळे सचिनच्या मताला फारशी किंमत देण्याचं काहीच कारण नाही.चहलने काल ट्विट केला होत कि आम्ही पाकच्या विरोध्दत कुठल्याही क्षणी लढायला तयार आहोत.
 
श्रीलंकेच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हापासून सर्वच संघानी पाक मध्ये सामना खेळण्यास नकार दिलाय. पाकला दुसऱ्या देशां मध्ये सामने घ्यावे लागतात.असल्या काही घटना बघता क्रिकेट जगताने पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पाकला हाकलून लावावं.भारताने मोठी कार्यवाही करत पाकमधील दहशतवादी तळ उद्वस्त करावेत.पाकचा आर्थिक कोंडी केल्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.संयुक्त राष्ट्रानेही पाकविरोधात ठराव पास करावा. कुठल्याच देशाने पाकला मदत करता काम नये. भारताने पाकचा तोंडच पाणी पळवलं हा निर्णय खरंच खूपच चांगला घेतला.
 
पाकला बऱ्याच अरब देशांचा छुपा पाठिंबा असतोच अन भारताने ओळखलं नसले अस होणार नाही. अमेरिका पण पाक ला छुपा पाठिंबा देतच असत. अमेरिकेचे हत्यार मग घेणार कोण ? नियत मध्ये खोट असलेल्या पाकला भीक तर नक्कीच लागेल.अन पाकच्या उलट्या बोंबा चालूच आहेत.