Widgets Magazine
Widgets Magazine

अश्‍विन, जडेजा, शमी यांना विश्रांती?

शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:54 IST)

ashwin jadeja

कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांवर पडलेला ताण ध्यानात घेऊन, तसेच आगामी मोसमातील व्यस्त वेळापत्रकाच्या दृष्टीने श्रीलंकेविरुद्ध 20 ऑगस्ट रोजी सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातील रविचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा या फिरकीवीरांना विश्रांती देण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. तसेच दुखापतीतून परतलेला वेगवान गोलंदाज महंमद शमीलाही विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यांच्या जागी यजुवेंद्र चाहल, अक्षर पटेल व कृणाल पांड्या या खेळाडूंचा समावेश करण्यात येऊ शकतो. झटपट क्रिकेटमधील स्पेशालिस्ट म्हणून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश निश्‍चित मानला जात आहे. वन डे मालिकेसाठी येत्या 13 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार असून कर्णधार विराट कोहली मात्र या मालिकेत खेळण्याबाबत आग्रही आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

भारताला श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्याची संधी

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सीरिजची ...

news

बीसीसीआयने खेळाडू आणि संघाची देणी फेडली

बीसीसीआयने खेळाडू आणि संघाची देणी फेडली आहे. देणी फेडल्याची ही यादी बीसीसीआयने ...

news

टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनला रवींद्र जडेजा

भारतीय ऑलराउंडर रवींद्र जडेजा आता टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनला आहे. जडेजाच्या अगोदर ...

news

एस श्रीशांतला केरळ हायकोर्टाकडून दिलासा

मॅच फिक्सिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या एस श्रीशांतला सोमवारी केरळ हायकोर्टाने दिलासा दिला. ...

Widgets Magazine