गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (20:44 IST)

Deepak-Jaya Marriage; टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आज विवाहबंधनात अडकणार

फोटो साभार- सोशल मीडिया 
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आज विवाहबंधनात अडकणार आहे. दीपक चहर आणि त्यांची मंगेतर जया भारद्वाज आज आग्रा येथे सप्तपदी घेतल्यानंतर कायमचे एकमेकांसोबत राहणार आहेत. लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी लग्नाआधी दोन्ही कुटुंबांनी मेहंदी सोहळ्यात भाग घेतला. यावेळी दीपक चहर पठाणी कुर्त्यामध्ये दिसला. दरम्यान, दीपक चहर आणि त्यांची मंगेतर जया भारद्वाज यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही आनंदाने नाचताना दिसत आहेत
 
दीपक चहर आणि मंगेतर जया भारद्वाज आज फतेहाबाद मार्ग, आग्रा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये वैवाहिक बंधनात अडकणार. मंगळवारी लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आणि मेहंदीनंतर मंगळवारी संध्याकाळी संगीताचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. दीपक चहरने आपले लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी जोरदार नृत्याचा सराव केला. मैफिलीत दोघाच्या कुटुंबीयांनी अनेक चित्रपट गाण्यांवर जोरदार नृत्य केले. दीपक चहर हा टीम इंडियाचा स्टार गोलंदाज असून त्याच्या लग्नाला क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
 
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी दीपक चहरच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय टीम इंडियातील त्याचे अनेक सहकारी खेळाडू आणि त्याच्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचे सहकारी खेळाडूही येण्याची शक्यता आहे.