testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

क्रिकेट प्रशासनावर अर्जुना रणतुंगा नाराज

arjun ranatunga
कोलंबो| Last Modified शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017 (12:43 IST)
श्रीलंका क्रिकेट प्रशासनावर त्यांचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा प्रचंड नाराज आहे. 1996 ला श्रीलंकेला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा असलेला रणतुंगा प्रशासनातील हलगर्जीपणामुळे श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे सामनेही पाहात नाही. श्रीलंकेतील सिलोन टुडे या वर्तमानपत्रात त्याने म्हटले आहे की, श्रीलंका क्रिकेटचे प्रशासन ज्या पद्धतीने चालविले जात आहे, ते इतके मुर्खपणाचे आहे की, मी आमच्या संघाचे सामने पाहणेही सोडून दिले आहे. रणतुंगा म्हणतो की, श्रीलंकेचे सामने पाहण्यापेक्षा मी इंग्लंड-दक्षिण आफ्रिका कसोटी पाहणे अधिक पसंत करतो.


यावर अधिक वाचा :