शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (11:36 IST)

VIDEO: ब्राव्होने धोनीच्या गाण्याचे टीझर शेअर केले, हेलिकॉप्टर सेलिब्रेशन डान्स दाखवला

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने महेंद्रसिंग धोनीच्या 'नंबर -7' या गाण्याचे टीझर आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहे. टीझरमध्ये धोनीच्या जर्सी नंबर 7, 2007 टी -20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच हेलिकॉप्टर सेलिब्रेशनचा उल्लेख आहे. ब्राव्होने हेलिकॉप्टर सेलिब्रेशनवर डान्स स्टेपदेखील सादर केल्या आहे. मात्र आश्वासनानुसार ब्राव्होने चाहत्यांच्या हेलिकॉप्टर नृत्याचे व्हिडिओही शेअर केले आहेत.
 
हे गाणे महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवशी 7 जुलै रोजी रिलीज होणार असल्याचे ब्राव्होने आधीच सांगितले आहे. इंडियन प्रीमियर लीग दरम्यान ब्राव्हो आणि धोनी यांनी चेन्नई सुपर किंग्जचा ड्रेसिंग रूम अनेक वर्षांपासून शेअर केला आहे. ब्राव्होने यापूर्वीही काही गाणी रिलीज केली आहेत. 2016 मध्ये  वेस्ट इंडीजचे टी -२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांचं एक गाणं एंथम बनले होते आणि ते प्रसिद्ध ही झाले होते.
 
ब्राव्होने अलीकडेच सांगितले होते की धोनीचा इतर अनेक खेळाडूंप्रमाणेच त्याच्या कारकीर्दीवरही परिणाम झाला आहे. आता त्याला धोनीसाठी काहीतरी करायचे आहे. ब्राव्हो म्हणाला होता, धोनी त्याच्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे, माझ्या करिअरवरही त्याचा खूप प्रभाव आहे. ब्राव्होने क्रिकबझ येथे हर्षा भोगले यांना सांगितले होते की आता मला धोनीसाठी काहीतरी करायचे आहे, म्हणून आम्ही हे गाणे धोनीसाठी अर्पण करीत आहोत.