testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

WWC : भारताने श्रीलंकाचा 16 धावांनी पराभव केला

डर्बी| Last Modified गुरूवार, 6 जुलै 2017 (09:22 IST)
दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज यांची शानदार अर्धशतके आणि त्यांनी केलेली झुंजार शतकी भागीदारी यामुळे महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 16 धावांनी पराभव करत महिला विश्‍वचषक स्पर्धेत विजयी चौकाराची नोंद केली आहे. भारतीय महिला संघाला श्रीलंका महिला संघासमोर विजयासाठी 233 धावांचे आव्हान ठेवता आले. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय महिला संघाने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 232 धावांची मजल मारली.
विजयासाठी षटकामागे सुमारे पाच धावांच्या सरासरीने धावा करण्याचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या श्रीलंकेच्या महिला संघाची सुरुवात चांगली झाली नाही. झूलन गोस्वामीने सलामीवीर हसिनी परेराला केवळ 10 धावांवर तंबूत परतवून भारतीय महिलांना पहिले यश मिळवून दिले. परंतु त्यानंतर निपुणी हंसिका व चमारी अटाप्टटू या जोडीने श्रीलंकेच्या महिलांचा डाव सावरला. मात्र, श्रीलंका संघाला 50 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावांपर्यंत मजल मारता आली.
त्याआधी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाची सलामीची जोडी केवळ 38 धावा फळकावर असताना परतली होती. याआधी अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्मृती मंधानाला केवळ 8 धावांवर बाद करून चंडिमा गुणरत्नेने भारताला पहिला धक्‍का दिला. त्यानंतर श्रीपाली वीराकोड्डीने पूनम राऊतलाही (16) बाद करून भारताची 2 बाद 38 अशी अवस्था केली.
याच वेळी दीप्ती शर्मा आणि मिताली राज यांची जोडी जमली. या दोघींनी जम बसविण्यासाठी काही वेळ घेतला. पण सूर गवसल्यावर आक्रमक फटकेबाजी करीत तिसऱ्या विकेटसाठी 26 षटकांत 118 धावांची बहुमोल भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. दीप्तीने 110 चेंडूंत 10 चौकारांसह 78 धावा केल्या. तर मितालीने 78 चेंडूंत 4 चौकारांसह 53 धावांची खेळी केली. अखेर कांचनाने दीप्तीला बाद करून ही जोडी फोडली. झूलन गोस्वामीला बढती देण्याचा प्रयोग अपयशी ठरला. श्रीलंकेची कर्णधार इनोका रणवीराने लागोपाठच्या चेंडूंवर झूलन व मिताली यांना बाद करून भारताची पुन्हा 5 बाद 169 अशी घसरगुंडी घडवून आणली. परंतु वेदा कृष्णमूर्ती (29) आणि हरमनप्रीत कौर (20) यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करीत भारतीय महिलांना द्विशतकाची मजल मारून दिली. श्रीलंकेकडून श्रीपाली वीराकोड्डीने 28 धावांत 3, तर इनोका रणवीराने 55 धावांत 2 बळी घेतले.


यावर अधिक वाचा :

२९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर जीएसटी कपात

national news
जीएसटी कौन्सिलने २९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर असलेल्या करात कपात करण्याचा ...

पुणे : ५६ मांजरांसाठी न्यायालयात धाव

national news
पुण्यातील महिलेने ५६ मांजरांना जप्त केल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सोन्याच्या दरात घसरण

national news
सोन्याच्या दरात घट झाली आहे.दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच ...

विराट कोहली आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

national news
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) २०१७ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ...

सोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम

national news
पूर्ण राज्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला हलवणारया अश्या सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक ...