1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2018 (14:24 IST)

हार्दिक पांड्या आणि एली अवरामचं डेटिंग?

hardik and ali abram
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं जुनं आहे. नुकतंच विराट-अनुष्का यांच्या लग्नामुळे हे नातं दृढ झालं. आता टी इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याही स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा आहेत. हार्दिक पांड्या सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. एलीसुद्धा दक्षिण आफ्रिकेला फेरफटका मारण्यासाठी गेली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एली हार्दिकची गर्लफ्रेण्ड असल्यावर शिक्काबोर्तब करणारा एक फोटो समोर आला आहे. शिखर धवनची बायको आयेशाने त्यांची मुलगी रियाच्या 13व्या वाढदिवसाचा फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दौर्‍यावर असलेल्या क्रिकेटपटूंच्या बेटर हाफ (वॅग्स- वाईफ अँड गर्लफ्रेण्ड्‌स) दिसत आहेत. रोहितची पत्नी रितीका, भुवीची पत्नी नूपुर, अश्विनची पत्नी प्रीती, उमेशची पत्नी तान्या, राहाणेची पत्नी राधिका यांच्यासोबत एलीसुद्धा हजर आहे. एली अवराम बिग बॉसच्या एका पर्वात झळकली होती. त्याशिवाय तिने मिकी व्हायरस, किस किसको प्यार करु, नाम शबाना यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे.