मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2018 (11:42 IST)

'पद्मावत' फेसबुकवर लीक

'पद्मावत' सिनेमा  फेसबुकवर हा सिनेमा लीक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या एका चाहत्याने फेसबुकवर हा सिनेमा लीक केला आहे. फेसबुकवर एका पेजवर सिनेमागृहातुन चक्क फेसबुक लाइव्ह करत सिनेमा लीक करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'जाटों का अड्डा' या फेसबुक पेजवरुन हा सिनेमा फेसबुक लाईव्ह करण्यात आल्याचं बोललं जात आहे. जवळपास २५ मिनिटे 'पद्मावत' हा सिनेमा लाईव्ह करण्यात आला. फेसबुक लाईव्हचा हा व्हिडिओ तब्बल १५,००० युजर्सने आपल्या वॉलवर शेअर केल्याचं समोर आला आहे.