शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 23 जानेवारी 2023 (16:49 IST)

ICC पुरुष T20I टीम ऑफ द इयर घोषित, टीम इंडियाच्या या 3 खेळाडूंना स्थान मिळाले

ICC T20 Team of the Year 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC पुरुष T20I टीम ऑफ द इयर जाहीर केली आहे. वर्ष 2022 चा खेळ पाहता ICC ने टॉप 11 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या संघात भारताचे 3 खेळाडू आपली जागा निश्चित करण्यात यशस्वी झाले आहेत. याशिवाय इंग्लंडला 2023 चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या जोस बटलरला ICC च्या सर्वोत्तम T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
 
टीम इंडियाच्या या तीन खेळाडूंना स्थान मिळाले
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, फलंदाज सूर्यकुमार यादव आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांनी ICC पुरुषांच्या T20I टीम ऑफ द इयरमध्ये स्थान मिळवले आहे. 2022 हे वर्ष विराट कोहलीसाठी खूप चांगले होते, त्याने या वर्षी आशिया चषक आणि T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव हा या वर्षातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज ठरला.
 
2022 हे वर्ष सूर्यकुमारसाठी संस्मरणीय ठरले
2022 मध्ये सूर्यकुमार यादव हा टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. या वर्षी त्याने 31 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1,164 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 9 अर्धशतके आणि 2 शतके झळकली. यासह, तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. सध्या तो टी-२० क्रिकेटमधला नंबर वन फलंदाज आहे. सूर्यकुमार यादव एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने या वर्षात एकूण 68 षटकार मारले.
 
ICC पुरुष T20I टीम ऑफ द इयर
जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोहम्मद रिझवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सॅम कुरन, वानिंदू हसरंगा, हरिस रौफ, जोश लिटल.
Edited by : Smita Joshi