शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (15:05 IST)

पाकिस्तान वर्ल्ड कप खेळणार, ICC ने BCCI च्या मागणीस नकार दिला

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायाहून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ची पाकिस्तानला वगळण्याची मागणी नाकारली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर BCCI ने ICC ला पत्र लिहून, जागतिक संस्था आणि त्याच्या सदस्य देशांकडून दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या देशांपासून नातेसंबंध तोडण्याची अपील केली होती. 
 
क्रिकेटच्या सर्वोच्च संघ ICC ने आपल्या बैठकीत BCCI ची ही विनंती स्वीकारण्यास नकार दिला आहे. BCCI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ICC ने स्पष्ट केले आहे की ही विनंती अमलात आणता येणार नाही. ICC ने वर्ल्ड कपमध्ये आमच्या सुरक्षेला महत्त्व दिले आहे, पण पाकिस्तानबद्दल मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. 
 
पुलवामा हल्ल्यानंतर सौरव गांगुली आणि हरभजन सिंह सारख्या माजी क्रिकेटपटूंनी मागणी केली होती की वर्ल्ड कपमध्ये 16 जून रोजी भारताने पाकिस्तानविरुद्ध सामन्याचा बहिष्कार करावा. त्यांनी असेही म्हटले होते की पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायापासून वेगळे केले पाहिजे. तथापि BCCI ने आतापर्यंत या प्रकरणावर कोणताही निर्णय घेतला नाही आहे. बोर्डाप्रमाणे या प्रकरणात ते सरकारच्या आदेशांचे पालन करतील.