मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (07:11 IST)

ICC Test Rankings: ICC क्रमवारीत भारतीय चमकले, यशस्वीला 11 स्थानांचा फायदा, रोहित नवव्या स्थानावर

ICC Test Rankings:  भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने ताज्या ICC कसोटी क्रमवारीत मोठी कामगिरी केली आहे. तो 11 स्थानांची चढाई करत 63 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगल्या कामगिरीचा फायदा झाला असून बुधवारी जाहीर झालेल्या फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे. 
 
पोर्ट ऑफ स्पेन मध्ये वेस्टइंडिजच्या  विरुद्ध ड्रॉ झालेल्या सामन्यात 21 वर्षीय जयस्वालने 57 आणि 38 धावा केल्या. यामुळे त्याला आता 466 गुण आहेत. दुसऱ्या कसोटीत 80 आणि 57 धावा करणारा रोहित हा भारतीय कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याचे 759 गुण आहेत आणि तो श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेसोबत नवव्या स्थानावर आहे.
 
कसोटी रँकिंग मध्ये रोहित नंतर रिषभ पंत दुसरे सर्वात उत्कृष्ट मानांकित खेळाडूअसून  त्याचे 743 गुण असून एका स्थानाच्या नुकसानासह तो 12व्या स्थानावर आहे. विराट कोहली 733 गुणांसह 14व्या स्थानावर कायम आहे. 
 
इशेज मध्ये चांगली खेळी खेळणारे आस्ट्रेलियाचे मार्न्स लाबुशेन आणि  इंग्लंडच्या  जो रूट यांनी प्रत्येकी तीन स्थानांनी प्रगती करत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन 883 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा जॅक क्रॉली 13 स्थानांनी 35 व्या, हॅरी ब्रूक 11 व्या आणि जॉनी बेअरस्टो तीन स्थानांनी वाढून 19 व्या स्थानावर आहे. 
 
रविचंद्रन अश्विन (879 )यादीत अव्वल स्थान कायम राखले आहे, तर रवींद्र जडेजा (782) सहाव्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही क्रमवारीत प्रगती केली असून सहा स्थानांनी प्रगती करत 33 व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्याने गॅलेमध्ये सात विकेट्स घेत सात स्थानांनी प्रगती करत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जयसूर्याचा फिरकी जोडीदार रमेश मेंडिस या सामन्यात सहा विकेट्ससह एक स्थानाने पुढे 21व्या स्थानावर पोहोचला आहे. 
 
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड तीन स्थानांनी 23 व्या स्थानावर आहेपार आणि ख्रिस वोक्स पाच स्थानांनी वाढून 31व्या स्थानावर आहेत, तर पाकिस्तानचा लेगस्पिनर अबरार अहमद 12 स्थानांनी 45व्या आणि वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकीपटू जोमेल वॉरिकन सहा स्थानांनी 62व्या स्थानावर आहे.
 



Edited by - Priya Dixit