मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (13:57 IST)

IND vs ENG:इंग्लंडमध्ये मालिका जिंकून भारताने ICC क्रमवारीत वाढ केली

भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या विजयासह भारताने अनेक विक्रम केले आहेत आणि आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही आपले स्थान मजबूत केले आहे. आता तिसऱ्या क्रमांकावरील भारताची स्थिती मजबूत झाली आहे. 
 
पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवून भारताने आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले आहे. 
 
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या पराभवानंतर मालिका गमावण्याचा धोकाही निर्माण झाला होता. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका गमावली असती तर पाकिस्तान आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला असता आणि भारत चौथ्या स्थानावर घसरला असता, मात्र मालिका जिंकून टीम इंडियाने आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. 
 
आता भारताचे 109 रेटिंग गुण आहेत आणि ते पाकिस्तानपेक्षा तीन रेटिंग गुणांनी पुढे आहे. तर, न्यूझीलंडचा संघ128 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंडचा संघ भारताकडून पराभूत होऊनही 212 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 101 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. 
 
भारताला या आठवड्यापासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे आणि येथे विजय मिळवून भारत आपली स्थिती आणखी मजबूत करू शकतो. पाकिस्तान सध्या श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळत असून ऑगस्टमध्ये हा संघ नेदरलँडमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहे.