शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 8 जानेवारी 2023 (10:09 IST)

IND vs SL T20: सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमध्ये तिसरे शतक झळकावले,बाबर आझम आणि लोकेश राहुलला मागे टाकले

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार शतक झळकावले. एका वर्षातच त्याने भारतासाठी तिसऱ्यांदा T20 क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सूर्याचे हे तिसरे शतक होते. या खेळीने त्याने भारताच्या लोकेश राहुल आणि पाकिस्तानच्या बाबर आझमसह अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. तर, सूर्यकुमार यादवने हा पराक्रम तीनदा केला आहे. 
आता फक्त भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात सूर्यकुमारच्या पुढे आहे. रोहितने भारतासाठी T20 मध्ये चार शतके झळकावली आहेत आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो फलंदाज आहे. 
 
सूर्यकुमार मॅक्सवेल आणि मुनरोच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. झेक प्रजासत्ताकच्या द्विजीनेही आपल्या देशासाठी टी-20 मध्ये तीन शतके झळकावली आहेत, परंतु तो सहयोगी संघाचा भाग आहे.
 
सूर्यकुमार यादवने जुलै 2022 मध्ये भारताकडून इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये पहिले शतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली. यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध 51 चेंडूत नाबाद 111 धावांची खेळी केली. आता त्याने श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली.
 
या सामन्यात सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टी-२० मधील भारताचे हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. भारतासाठी सर्वात वेगवान टी-20 शतक रोहित शर्माने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध झळकावले होते. त्याने 35 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.

Edited By - Priya Dixit