शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: विशाखापट्टणम , सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (13:01 IST)

भारताचा 246 धावांनी विजय!

भारताने डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-वीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा कसोटी क्रिकेट सामन्यात 246 धावांनी पराभव केला.    
 
भारताच्या या विजयात गोलंदाजांचा महत्त्वपूर्ण योगदान राहिला आणि त्यांनी इंग्लंडचा पहिला डाव 255 आणि दुसरा डाव 158 धावांवर समाप्त केला.  
 
इंग्लंडचा दुसरा डाव लंचनंतर आर अश्विन (तीन विकेट, जयंत यादव (तीन विकेट), मोहम्मद शमी (दोन विकेट) आणि रवींद्र जडेजा (दोन  विकेट)ने मिळून 158 धावांवर गुंडाळला.  
 
भारताने पाच्वया दिवशी खेळाच्या सुरवातीत एकानंतर एक इंग्लंडच्या फलंदाजांना पॅवेलियनचा रस्ता दाखवला आणि सामना आपल्या मुठीत करून घेतला. लंचपर्यंत इंग्लंडने 142 धावांवर सात विकेट गमवले होते. लंचनंतर 158 धावांवर संपूर्ण संघ आऊट झाला आणि भारताने हा टेस्ट 246 धावांनी जिंकला.    
       
शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी 8 विकेट्सची गरज होती. सामना ड्रॉ करण्याच्या उद्देशाने इंग्लंड संघ मैदानावर उतरला होता. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचे खेळाडू जास्त वेळ टिकू शकले नाही, आणि एकामागोमाग विकेट्स गमावल्या. पहिल्या सत्रात भारताने 55 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
- विशाखापट्टणम कसोटीत भारताचा 246 धावांनी विजय! मालिकेत 1-0 अशी आघाडी.
- इंग्लंडला नववा धक्का. भारत विजयाच्या उंबरठ्यावर.
- इंग्लंडला आठवा धक्का. अश्विनने अंसारीला धाडले माघारी.
- इंग्लंडला आठवा धक्का. अश्विनने अंसारीला धाडले माघारी.
 भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना - इंग्लंडची सातवी विकेट, भारताला विजयासाठी 3 विकेट्सची गरज, धावसंख्या - 129/7.