Widgets Magazine
Widgets Magazine

ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करून भारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

शुक्रवार, 21 जुलै 2017 (10:47 IST)

महिला विश्वचषकात काल भारतीय महिलांनी धक्कादायक निकालाची नोंद केली आहे.  माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर मात करून भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात करत रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचं तिकीट बूक केलं. रविवारी मिताली राजच्या टीम इंडियाची गाठ यजमान इंग्लंडच्या महिला संघाशी पडणार आहे.  भारताने दिलेल्या २८२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिलांचा संघ २४५  धावांमध्ये बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स ब्लॅकवेलने अखेरच्या षटकांमध्ये ताबडतोड फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारताचा विजय थोडा लांबला. मात्र दिप्ती शर्माने तिला बाद करून  ६ वेळा जगज्जेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचं पॅकअप केलं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

मुलीचा वाढदिवस साजरा केल्यामुळे शमीला ट्रोल

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीने मुलीचा वाढदिवसाचे फोटो शेअर केले. ज्यावर इस्लाममध्ये ...

news

सेहवागसह चाहत्यांनी केला स्मृती मंधानाच्या ट्‌विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

भारतीय महिला संघाची आक्रमक फलंदाज स्मृती मंधानाचा आज वाढदिवस आहे. मांधनाचा हा 21 वा ...

news

नागपूर : वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. नागपुरातील ...

news

मोहम्मद शमीला शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न

भारतीय क्रिकेट संघातील तेज गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता येथे चौघांनी शिवीगाळ आणि ...

Widgets Magazine