भारत-पाक T20 वर्ल्डकपची तारीख ठरली
T20 World Cup 2024 schedule पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. टी-20 विश्वचषकातही भारताला पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पाकिस्तानशिवाय भारताला आणखी तीन संघांसोबत सुपर 8 सामने खेळावे लागतील.
आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा : भारतीय संघ 2013 पासून आयसीसी विजेतेपदाची वाट पाहत आहे. भारतीय संघाला गेल्या 11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2023 मध्ये भारताला ट्रॉफी जिंकण्याच्या दोन संधी नक्कीच होत्या. पण दोन्ही वेळा भारतीय संघ अंतिम फेरीत जाऊन विजेतेपदाला मुकले होते. 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला चांगली कामगिरी करायची आहे.
वेळापत्रक असे राहू शकते: मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पाकिस्तान व्यतिरिक्त, भारतीय संघ सुपर 8 मध्ये आयर्लंड आणि कॅनडाचा सामना करेल. अशा स्थितीत भारतीय संघ सहज पुढचा टप्पा गाठू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघ 5 जून रोजी टी-20 वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळणार आहे. संघाला पहिल्या सामन्यात आयर्लंडचा सामना करावा लागू शकतो.
तर दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना 9 जूनला पाकिस्तानशी होणार आहे. तिसरा सामना 12 जूनला अमेरिकेसोबत खेळवला जाऊ शकतो. तर साखळी टप्प्यातील शेवटचा सामना भारतीय संघ कॅनडाविरुद्ध 15 जून रोजी खेळणार आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक असे असू शकते:
5 जून, भारत विरुद्ध आयर्लंड,
9 जून, भारत विरुद्ध पाकिस्तान,
12 जून, भारत विरुद्ध अमेरिका,
15 जून भारत विरुद्ध कॅनडा,
20 जून, भारत वि. C1
22 जून, भारत विरुद्ध श्रीलंका,
24 जून, भारत विरुद्ध सेंट लुसिया