बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (08:01 IST)

मुंबई प्रँचायजीच्या ताफ्यात झुलन गोस्वामी सामील

भारताची माजी महान महिला वेगवान गोलंदाज 40 वर्षीय झुलन गोस्वामीला महिला प्रिमियर लीगसाठी मुंबई प्रँचायजीने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. ती या संघात गोलंदाजी प्रशिक्षक व मेंटर म्हणून काम पाहणार आहे.
 
माजी फलंदाज व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबतची माहिती दिली. बीसीसीआय अध्यक्षपदाची मुदत गेल्या ऑक्टोबरमध्ये संपल्यानंतर ते पुन्हा आयपीएलमध्ये टीम डायरेक्टर म्हणून दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली, त्यावेळी महिला आयपीएलमधील कर्णधार तिला आपल्या ताफ्यात घेण्यास उत्सुक झाले आहेत, असे गांगुली यांनी म्हटले होते. झुलनला मुंबई प्रँचायजीनी घेतल्याचे त्यांनीच मंगळवारी उघड केले. आम्ही तिला ऑफर दिली होती. पण ती मुंबई संघाकडे जात आहे, असे गांगुली म्हणाले. झुलनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 355 बळी नोंदवले असून महिला क्रिकेटमध्ये तिच्याच नावावर सर्वाधिक बळींची नोंद आहे. फेब्रुवारी 11 किंवा 13 रोजी महिला आयपीएलसाठी दिल्ली किंवा मुंबईत लिलाव होणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor