गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (16:37 IST)

KKR vs DC IPL 2021 :कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिकंले, दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल स्कोअर: आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 41 वा सामना आज शारजामध्ये खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत आहे.
 
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच शारजामध्ये होणाऱ्या या सामन्यात दिल्ली प्रथम फलंदाजी करेल.
या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. केकेआरमध्ये आंद्रे रसेलच्या जागी टीम साऊथी आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप वॉरियरचा समावेश करण्यात आला आहे, तर दिल्ली कॅपिटल्समध्ये जखमी पृथ्वी शॉच्या जागी स्टीव्ह स्मिथला संधी मिळाली आहे.
 
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
दिल्ली कॅपिटल्स: 
शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभपंत (C/W), ललित यादव, शिमरॉन हेटमायर,अक्षर पटेल,आर अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे,आवेश खान
 
कोलकाता नाईट रायडर्स: 
शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन (क), दिनेश कार्तिक,सुनील नारायण, टीम साउथी, लॉकी फर्ग्युसन, संदीप वॉरियर, वरुण चक्रवर्ती