IND vs SA:केएल राहुल आणि कुलदीप यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर,ऋषभ पंत कर्णधार पदी
IND vs SA:भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी होणार आहे. याच्या एक दिवस आधी एक वाईट बातमी समोर आली आहे. कर्णधार केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती दिली. पाचही सामन्यांमध्ये त्याच्या जागी ऋषभ पंत टीम भारताचा आठवा T20 कर्णधार असेल
केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नसल्याचं बीसीसीआयने ट्विट केलं आहे. बोर्डाने सांगितले की, "टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे, तर कुलदीप यादवला फलंदाजी करताना उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे टी-20 मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
दक्षिण आफ्रिकेचा संघ 9 जून ते 19 जून या कालावधीत पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना कटकमध्ये, तिसरा विशाखापट्टणममध्ये, चौथा राजकोटमध्ये आणि पाचवा सामना बेंगळुरूमध्ये होईल. दक्षिण आफ्रिका संघ 2019 नंतर प्रथमच भारतात टी-20 मालिका खेळणार आहे.
आतापर्यंत त्याला दोनदा भारतीय भूमीवर टी-20 मालिकेत खेळण्याची संधी मिळाली आहे. 2015 मध्ये आफ्रिकन संघाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली होती. त्यानंतर 2019 मध्ये तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. दोन्ही संघांमध्ये सहा टी-20मालिका खेळल्या गेल्या आहेत. यादरम्यान टीम इंडियाने तीन आणि दक्षिण आफ्रिकेने दोन मालिका जिंकल्या आहेत.
भारताचा T20I संघ आता खालीलप्रमाणे आहे
ऋषभ पंत (C/W), हार्दिक पंड्या (VC), रुतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (WK), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.