रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

एमएस धोनीची काश्मीरमध्ये पोस्टिंग, 15 दिवस खतरनाक फोर्ससोबत घेतील ट्रेनिंग

इंडियन क्रिकेट टीमचे स्‍टार खेळाडू एमएस धोनी लवकरच सेनेशी जुळणार आहे. ते 31 जुलैला काश्मीरमध्ये तैनात टेरिटोरियल आर्मीच्या 106व्या पॅराशूट बटालियनमध्ये सामील होणार आहे. सेनेकडून सांगण्यात आले की लेफ्टनंट कर्नल (ऑनरेरी) एमएस धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंत आपल्या बटालियनमध्ये सामील होण्यासाठी 106व्या टेरिटोरियल आर्मी बटालियन (पॅराशूट) याशी जुळणार आहे. ही युनिट काश्मीरमध्ये तैनात आहे. धोनी बटालियनशी जुळल्यानंतर गार्ड, पोस्‍ट ड्यूटी, पेट्रोलिंग सारख्या ड्यूटी सांभाळतील आणि जवानांसोबतच राहणार.
 
धोनी यापूर्वी देखील जम्मू-काश्मीर गेलेले आहेत. 2017 साली धोनी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे गेले होते, जेथे त्यांनी आर्मीकडून आयोजित क्रिकेट मॅचमध्ये गेस्ट म्हणून भाग घेतला होता. धोनी हा सामना आर्मीचा युनिफॉर्म घालून बघायला गेले होते.
 
उल्लेखनीय आहे की एमएस धोनी यांना 2011 मध्ये इंडियन टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल रॅक मिळालेली असून धोनी यांचं आर्मी प्रेम झळकत असतंच. महेंद्र सिंह धोनी यांनी टीम इंडियाला क्रिकेटच्या प्रत्येक फार्मेटमध्ये उंची गाठवण्यात मदत केली. परंतू रांची रहिवासी धोनी क्रिकेटर नाही तर अजून काही बनू इच्छित होता. धोनी यांनी एका इंटरव्‍यूहमध्ये सांगितले होते की मला लहानपणापासून सेनेत जाण्याची इच्छा होती. ते रांचीच्या केंट एरियामध्ये अनेकदा फिरायला जात होते परंतू भाग्यात अजून काही लिहिले होते.