Widgets Magazine
Widgets Magazine

मनोज प्रभारकरचा राजीनामा

manoj prabhakar
लखनौ- भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकरने उत्तर प्रदेश रणजी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजनीमा दिला. वैयक्तिक कारणास्तव आपण या पदावर आणखी राहू शकत नसल्याचे कारण त्याने यावेळी दिले. प्रभाकरची प्रशिक्षकपदाची मुदत दोन वर्षांची होती. मात्र, केवळ एकाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर त्याने पायउतार होण्याच निर्णय घेतला.
Widgets Magazine
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना आता जूनमध्ये नवा प्रशिक्षक नेमण्यासाठी बैठक घेईल. असे संकेत आहेत. उत्तर प्रदेशाला मागील रणजी हंगामात बरेच अपयश झेलावे लागले. अ गटात हा संघ सातव्या स्थानी फेकला गेला होता. प्रभाकरपूर्वी माजी मध्यमगती गोलंदाज व्येंकटेश प्रसादने या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा संभाळली. पण त्यावेळी देखील उत्तरप्रदेश संघाची कामगिरी यथातथाच राहिली होती.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :