शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

आयसीसी क्रमावारीत मिताली दुसऱ्या स्थानी

भारतीय महिला संघाची कर्णधार आणि आक्रमक फलंदाज मिताली राजने सध्या सुरू असलेल्या महिला विश्‍वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याने ती आयसीसीच्या फलंदाजीच्या अव्वल स्थानापासून काही अंतरावरच आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या फलंदाजीच्या क्रमवारीत मिताली दुसऱ्या स्थानी कायम आहे.
 
महिला विश्‍वचषक स्पर्धेतील शनिवारी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मिताली राजने केलेल्या शतकीय खेळाच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मिताली राजने विश्‍वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात आतापर्यंत एकूण 356 धावा केल्या आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम करणारी मिताली राज 774 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. मेग लॅनिंगपेक्षा मिताली फक्त पाच गुणांने मागे आहे. आयसीसीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत लॅनिंग 779 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलियाची ऍलीस पेरी ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसीच्या पहिल्या दहा फलंदाजांमध्ये मिताली राज ही एकमेव फलंदाज आहे.