बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (23:51 IST)

PAK vs BAN: पाकिस्तान कडून बांगलादेशचा सात गडी राखून पराभव

Pakistan vs bangladesh Asia Cup 2023 :आशिया कप 2023 च्या सुपर फोर फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 193धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने तीन गडी गमावून 194 धावा केल्या आणि सामना सात विकेटने जिंकला.

पाकिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यातील विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 38.4 षटकांत 193 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने 39.3 षटकांत तीन गडी गमावून 194 धावा केल्या आणि सामना सात विकेटने जिंकला. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने 64 आणि शकिब अल हसनने 53 धावांचे योगदान दिले. नईमने 20 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानच्या हरिस रौफने चार आणि नसीम शाहने तीन बळी घेतले.
 
पाकिस्तानच्या इमाम-उल-हकने 78 आणि मोहम्मद रिझवानने नाबाद 63 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन, शॉरीफुल आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मोहम्मद रिझवानने 71 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे 11वे अर्धशतक असून त्याच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला 
 




Edited by - Priya Dixit