1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 26 मे 2025 (12:01 IST)

PBKS vs MI:आयपीएल 2025 चा 69 वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई यांच्यात

PBKS vs MI
आयपीएल 2025 च्या 69 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल.दोन्ही संघाने प्लेऑफ मध्ये आपापले स्थान निश्चित केले आहे. 
दोन्ही संघासाठी सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल त्याला पॉईंट्स टेबल मध्ये टॉप 2 मध्ये स्थान मिळेल. आणि त्याला क्वालिफायर1 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.आजचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

या स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. प्रथम फलंदाजी करताना धावा करणे सोपे असते. आयपीएलमध्ये आतापर्यंत जयपूरच्या या मैदानावर एकूण 63 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 23 सामने जिंकले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने 40 सामने जिंकले आहेत. येथे जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करू शकतो. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पंजाब किंग्जच्या नावावर आहे. त्याच हंगामात त्याने राजस्थानविरुद्ध 219 धावा केल्या होत्या.
सर्वात कमी धावसंख्येचा संघ असल्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या नावावर आहे. 2023मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात, आरआर 59 धावांवर ऑलआउट झाला.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स : रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
इम्पॅक्ट सब्स- रोहित शर्मा
पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग,
इम्पॅक्ट सब्स- प्रवीण दुबे
 
Edited By - Priya Dixit