Widgets Magazine

कोलंबो कसोटीत अष्टपैलू आर. अश्‍विनची कामगिरी

Last Modified शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (13:18 IST)
दुसऱ्या कसोटीत भारताच्या आर. अश्विनने दमदार अर्धशतक आणि दोन गडी बाद करत अष्टपैलूी कामगिरी केली. अश्विनेने 54 धावा करताच कसोटीमध्ये 2000 धावांचा पल्लाही पार केला. सर्वात कमी कसोटी सामन्यात 2000 धावा आणि 275+ विकेट करण्याचा विक्रम आर. अश्विनने केला. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हेडलीच्या नावावर होता. गेल्या दहा दिवसांत अश्विनने सर रिचर्ड हेडलीचा विक्रम दोन वेळा तोडला आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने कारकिर्दीतील 50 व्या कसोटी सामन्यात 275+ विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. यापूर्वी सर रिचर्ड हेडली यांनी 1981मध्ये 50 व्या कसोटी सामन्यात 262 विकेट घेतल्या होत्या. अश्विनने 51 कसोटीमध्ये 281 विकेट घेतल्या आहेत. यासाठी हेडली यांना 58 कसोटी सामने खेळावे लागले होते. 2000 धावा आणि 250 विकेट घेण्यासाठी इयान बॉथम, इमरान खान यांना 55 कसोटी सामने खेळावे लागले होते. तर शॉन पोलॉकला 60 कसोटी सामने खेळावे लागले होते.


यावर अधिक वाचा :