बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 15 डिसेंबर 2024 (10:03 IST)

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय याने विजय मर्चंट ट्रॉफी सामन्यात नाबाद शतक झळकावले

Rahul Dravid
अनुभवी फलंदाज राहुल द्रविडचा मुलगा अन्वय याने शुक्रवारी झारखंडविरुद्धच्या विजय मर्चंट ट्रॉफी सामन्यात कर्नाटकसाठी नाबाद शतक झळकावले.
 
चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अन्वयने 153 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या, त्यामुळे कर्नाटक संघाने तीन दिवसीय सामन्याच्या शेवटच्या दिवशी 123.3 षटकांत 4 गडी गमावून 441 धावा काढण्यात यश मिळविले. .
 
प्रथम त्याने श्यामंतक अनिरुद्ध (76 धावा) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर सुकुर्थ जे (33 धावा) सोबत चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झारखंडचा संघ 128.4 षटकांत सर्वबाद 387 धावांवर आटोपला.
 
पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर कर्नाटकला तीन गुण मिळाले तर झारखंडला एक गुण मिळाला.
 
अन्वयने गेल्या वर्षी कर्नाटक अंडर-14 संघाचे नेतृत्व केले आणि अलीकडेच KSCA अंडर-16 आंतर-झोन स्पर्धेत बेंगळुरू क्षेत्रासाठी तुमकूर क्षेत्राविरुद्ध नाबाद 200 धावा केल्या.
 
अन्वयचा मोठा भाऊ समित (19) हा अष्टपैलू खेळाडू आहे. महाराजा T20 ट्रॉफीमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळल्यानंतर, त्याची सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्धच्या बहु-स्वरूपाच्या घरच्या मालिकेसाठी भारताच्या संघात निवड झाली.
Edited By - Priya Dixit