मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (23:40 IST)

राहुल द्रविडने अंडर-19 महिला संघासाठी पाठवला खास संदेश

Rahul Dravid
ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयानंतर वरिष्ठ पुरुष संघातील खेळाडू आनंदी दिसले. प्रशिक्षक राहुल द्रविडसह सर्व खेळाडूंनी चॅम्पियन मुलींसाठी खास संदेश पाठवला आहे. द्रविडने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. त्याच्याशिवाय आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 चॅम्पियन बनवणाऱ्या पृथ्वी शॉनेही महिला संघाचे अभिनंदन केले आहे
 
द्रविडच्या प्रशिक्षणाखालीच भारतीय पुरुष अंडर-19 संघाने 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 2018 अंडर-19 विश्वचषक जिंकला. द्रविडने बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “भारतीय महिला अंडर-19 संघासाठी आजचा दिवस ऐतिहासिक होता.”
टीम इंडियाने अंतिम फेरीत इंग्लंडचा सात विकेट्स राखून पराभव केला. महिलांच्या अंडर-19 T20 विश्वचषकाची ही पहिलीच आवृत्ती होती आणि भारताने जिंकून इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 68 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने 14 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.
 
Edited By - Priya Dixit