गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 11 जुलै 2017 (17:13 IST)

भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री !

रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यापासून ते 2019 च्या विश्‍वचषकापर्यंत रवि शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान, याआधी शास्त्रीने 2014 पासून ते 2016 पर्यंत भारतीय संघाचे सचिव म्हणून काम पाहिले होते.
 
भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड आज संध्याकाळपर्यंत करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी बीसीसीआयच्या सल्लागार समितीला दिले होते. त्यानुसार रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा निवड समितीने केली आहे. या सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांचा समावेश होते. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सल्लागार समितीने पाच जणांच्या मुलाखती घेतल्या यात रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांच्या समावश होता. सहावा उमेदवार फील सिमन्स अनुपस्थित राहिला होता. दरम्यान, या पाच जणांच्या यादीतून आज निवड समितीने रवि शास्त्री यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केला आहे.