Widgets Magazine

प्रशिक्षकपदासाठी रवि शास्त्रीदेखील इच्छूक

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्‍त झालेल्या पदासाठी आता भारतीय क्रिकेट संघाचे सचिव आणि माजी क्रिकेटर रवि शास्त्रीदेखील इच्छूक आहे.
कारण त्यांनी
या पदासाठी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

याआधी रवि शास्त्री यांनी या पदासाठी मागील वर्षीदेखील अर्ज दाखल केला होता परंतु, निवड समितीने अनिल कुंबळे यांना शास्त्रीपेक्षा अधिक पसंती दिली होती. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्राफीनंतर अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे सध्या या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दरम्यान, या पदासाठी माजी क्रिकेटर यानेदेखील अर्ज सादर केला आहे. तसेच टॉम मुडी, रिचर्ड पायबस आणि लालचंद राजपूत यांनीदेखील अर्ज दाखल केले आहेत.


यावर अधिक वाचा :