Widgets Magazine

वॉर्नला टिपताच अश्विनचा विक्रम

बंगळुरू: भारत व ऑस्ट्रेलिया संघात बंगळुरूत सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताचा विश्वविख्यात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने नवा विक्रम नोंदविला आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला केवळ 33 धावांवर अश्विनने बाद करताच अश्विनचा प्रकाश झोतात आला.
कसोटी क्रिकेटमध्ये डेव्हिड सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज म्हणून अश्विने संपूर्ण विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. एक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अश्विनने वॉर्नरला आठ वेळा बाद केले आहे. त्यापूर्वी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने वॉर्नरला 7 वेळा तंबूत पाठवले होते.


यावर अधिक वाचा :