गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

रोहित शर्मावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया

मुंबई- मांडीला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरीजहून बाहेर पडलेला भारतीय फलंदाज रोहित शर्मा उपचारासाठी पुढील आठवड्यात लंडनला रवाना होत असून तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या मालिकेलाही रोहित मुकण्याची शक्यता आहे.
 
न्यूझीलंडविरुद्ध 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या पाचव्या वन-डेत धाव घेताना रोहितच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यास किमान तीन महिने त्याला विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे 23 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील मालिकेतही तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. रोहित पुढील आठवड्यात लंडनला रवाना होत असून तेथील तज्ञांशी चर्चा केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जाईल. शस्त्रक्रिया झाल्यास 10 ते 12 आठवडे तो खेळू शकणार नाही. 
 
बीसीसीआय टीम रोहित शर्माला पूर्णपणे सहयोग करेल ज्याने तो पूर्ण फिट होऊन भारतीय क्रिकेटमध्ये प्रदर्शन करण्यात सक्षम होऊ शकेल.
 
तत्पूर्वी, रोहितनेही आपल्याला कमबॅक करण्यास किती कालावधी लागू शकतो हे आताच सांगता येणार नसल्याचे म्हटले होते. ‘बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सध्या डॉक्टरांच्या संपर्कात असून त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्यास मला बराच काळ बाहेर रहावे लागेल, असे त्याने म्हटले होते. एक ते दोन दिवसांत यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल, असेही हा फलंदाज म्हणाला.