शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (11:57 IST)

रोहितचे विक्रमी द्विशतक

रोहितने आपल्या कारकिर्दीतील तिसरे एकदिवसीय द्विशतक झळकावताना एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्थान मिळविले. रोहितने याआधी श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथील सामन्यात 264 धावांची विश्‍वविक्रमी खेळी केली होती. त्याने पहिले द्विशतक मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 मध्ये बंगळुरू येथे झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत एकूण सात द्विशतके झाली असून त्यातील तीन एकट्या रोहितच्या नावावर आहेत.
 
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, मार्टिन गुप्टिल व ख्रिस गेल असे बाकी चार द्विशतकांचे मानकरी आहेत. रोहितने आज श्रीलंकेविरुद्ध दुसरे द्विशतक झळकावताना कर्णधार म्हणून दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली. वीरेंद्र सेहवागने विंडीजविरुद्ध 219 धावा फटकावताना कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. रोहितने 173 एकदिवसीय सामन्यांमध्ये 16 शतकांसह 6417 धावा फटकावल्या आहेत.