testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुंबईची कामगिरी निराशाजनक, रोहितचा लाजीरवाणा रेकॉर्ड

मागच्या वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची कामगिरी यावर्षी निराशाजनक झाली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या १२ मॅचपैकी मुंबईचा ५ मॅचमध्ये विजय आणि ७ मॅचमध्ये पराभव झाला आहे. १० पॉईंट्ससह मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंतच्या १० आयपीएलमध्ये मुंबईनं सर्वाधिक ३ वेळा आयपीएल जिंकली आहे. या तिन्हीवेळा रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार होता. यावर्षी मात्र रोहितची बॅट अजूनही तळपलेली नाही. १२ मॅच खेळणाऱ्या रोहितनं २६.७०च्या सरासरी आणि १३७.६२च्या स्ट्राईक रेटनं २६७ रन बनवल्या आहेत. याचबरोबर रोहितनं या मोसमात एक लाजीरवाणं रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केलं आहे.
वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणाऱ्या रोहितनं आयपीएलच्या १० वर्षांमधलं खराब रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. या आयपीएलमध्ये रोहित शर्मा ३ वेळा पहिल्या बॉलवर झाला आहे. आयपीएलच्या याआधीच्या १० मोसमांमध्ये रोहित शर्मा कधीच पहिल्या बॉलवर आऊट झाला नव्हता. आयपीएलच्या इतिहासामध्ये रोहित शर्मा ७ वेळा शून्यवर आऊट झाला आहे. यापैकी तीन वेळा तर याच मोसमात तो शून्यवर आऊट झाला. आयपीएलच्या या मोसमात शून्यवर आऊट होण्याच्या बाबतीत रोहितनं त्याच्याच टीममधला सहकारी इशान किशनशी बरोबरी केली आहे. रोहितबरोबरच ईशान किशनही यावर्षी ३ वेळा शून्यवर आऊट झाला आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...

विराटचे करवां चौथचे ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट

national news
काही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ...

तर बीसीसीआय खेळाडूवर कारवाई करणार

national news
अनेकदा अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. तर काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा ...

मितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते

national news
भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या ...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत

national news
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी ...