बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सचिनने तरुणाच्या घरी जाऊन निभावला वादा

विजयवाडा- क्रिकेटर सचिन तेंडुलकरने दोन वर्ष पूर्वी केलेला वादा आंध्र प्रदेशाच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यात पुत्तमराजू कंदरिका गावात एका तरुणाच्या घरात जाऊन पूर्ण केले.
 
गावात हेलीकॉप्टरने उतरल्यानंतर सचिन बेंगलुरुच्या एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणार्‍या महेश नावाच्या तरुणाच्या घरी गेले आणि कुटुंबासह चहा प्यायला.
 
सचिनने आजच्याच दिवशी दोन वर्षापूर्वी आदर्श ग्राम योजना अंतर्गत गाव दत्तक घेतले होते आणि येथील विकास बघण्यासाठी तो दुसर्‍यांदा गावात आला होता. महेशची आई विजयलक्ष्मीने सांगितले की सचिन पुढल्यावेळी आपल्या पत्नीसह आमच्या घरी यावे.